मागील विधानसभा निवडणुकीत दोन जागांवर विजय मिळवलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आज घोषणा केली.
‘आम्हाला गुजरात निवडणूक काँग्रेससोबत युतीत लढवायची होती. परंतु त्यासाठी सुरूवातीपासून चर्चा देखील करण्यात आली. मात्र काँग्रेसने याला गांभीर्याने न घेता उशीर लावला, त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही स्वतंत्रपणे चांगली कामगिरी करू.’ असं पटेल यांनी म्हटले आहे.
काँग्रेसने या अगोदर देखील राष्ट्रवादी काँग्रेसकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गुजरात विधानसभेत दोन आमदारांचे संख्याबळ आहे. मागील राज्यसभा निवडणुकीतील मतदानात यापैकी एका आमदाराने भाजपला तर एकाने काँग्रेसला मतदान केले होते. आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या विरोधी पक्षाच्या एकतेला सुरूंग लागला आहे. राष्ट्रवादीच्या या निर्णयाचा फायदा नेमका कुणाला होणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
We wanted to contest in Gujarat in alliance with Congress and had talks with them too initially, but Congress did not seem serious and kept on delaying,so we will fight alone.Confident that we will do even better alone:Praful Patel,NCP pic.twitter.com/eYBRbUrZi0
— ANI (@ANI) November 20, 2017
COMMENTS