भाजप खासदार नाना पटोले यांनी घेतली अशोक चव्हाण यांची भेट !

भाजप खासदार नाना पटोले यांनी घेतली अशोक चव्हाण यांची भेट !

भाजप खासदार नाना पटोले यांनी काँग्रेस खासदार अशोक चव्हाण यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यापूर्वी नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. अशोक चव्हाण यांची भेट घेतल्यामुळे नाना पटोले काॅग्रेसच्या वाट्यावर आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  नाना पटोले आणि अशोक चव्हाण यांच्या भेटीत कीटकनाशक बंदी संदर्भात चर्चा झाली.  

 

नाना पटोले म्हणाले की, ‘अशोक चव्हाण आणि मी खासदार आहे. शेतक-यांच्या प्रश्नावर चर्चा केली. येणा-या लोकसभेत सरकारला काय जाब विचारायचा यांवर बोलणं झालं. सरकारची जी धोरणे चुकीची आहेत त्याला विरोध करणार.  मी कोणतेही आफर मान्य करत नाही. लोकांच्या प्रश्नासाठी मी प्रत्येकाला भेटणार आहे.’

COMMENTS