मुंबई – धर्मा पाटील या शेतक-याच्या मृत्यूनंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. शेतकरी विरोधी सरकारने एकप्रकारे धर्मा पाटील यांची हत्याच केली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाज वाटली पाहिजे,या शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्ताधाऱ्यांवर घणाघाती टीका केली आहे.
जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन. भावपूर्ण श्रद्धांजली !
या शेतकरीविरोधी सरकारने एकप्रकारे त्यांची हत्याच केली आहे. मुख्यमंत्री @dev_fadnavis यांना लाज वाटली पाहिजे.— Supriya Sule (@supriya_sule) January 28, 2018
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. ‘सरकारचे सर्वोच्च स्थान असलेल्या मंत्रालयात येऊन तुम्ही जीव दिला तरी हे गेंड्याच्या कातडीचे सरकार तुम्हाला न्याय देऊ शकत नाही हे धर्मा पाटील यांच्या निधनाने स्पष्ट झाले. या सरकारचा धिक्कार असून धर्मा पाटील यांच्या निधनासाठी राज्य सरकारच जबाबदार आहे. संबंधितांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. तसेच मर्जीतील कंपन्यांची खिसे भरण्यासाठी आणि पतंजलीची उत्पादने विकण्यासाठी सुरु केलेली ही ‘आपले सरकार’ सारखी नाटके बंद करून टाका, असेही त्यांनी म्हटले आहे.
https://twitter.com/dhananjay_munde/status/957680591146659840
हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबत आहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्वीज माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
दोनच दिवसांपूर्वी धर्मा पाटील यांच्या तब्येतची चौकशी करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे निधन धक्कादायक आहे. हे सरकार नक्की कुणासाठी काम करतंय? जनतेला न्याय देऊ शकत नसाल तर सत्तेत राहण्याचा काय अधिकार? नरेंद पाटील तुमच्या लढ्यात आम्ही सोबतआहोत. धर्मा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली pic.twitter.com/ddwTkDqIrc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 29, 2018
COMMENTS