“धर्मा पाटील या शेतक-याची आत्महत्या नव्हे तर हत्या !”

“धर्मा पाटील या शेतक-याची आत्महत्या नव्हे तर हत्या !”

मुंबई –  धर्मा पाटील या शेतक-यानं आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या मृत्युसाठी पुनर्वसन अधिकारी आणि सरकार जबाबदार असून अधिका-यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. काही दिवसांपूर्वीच धर्मा पाटील यांनी मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते परंतु उपचारादरम्यान त्यांचा अखेर मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या  विखरण या गावावर  शोककळा पसरली असून दोंडाईचा रस्त्यावर सरकारविरोधात शेतक-यांनी मोर्चा काढला आहे.

दरम्यान धर्मा पाटील यांना मी भेटलो होतो. त्यांच्या शेजारी ७४ गुंठे जमीन असलेल्या शेतक-याने एजंट मध्यस्थी करून पावणे दोन कोटी रूपये भरपाई घेतली होती, परंतु धर्मा पाटील यांनी एजंट माध्यमातून प्रयत्न केले नाही म्हणून त्यांना फक्त ४ लाख रुपये देण्यात आले असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धर्मा पाटील यांच्या कुटुंबियांना मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं आहे.

COMMENTS