मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर केलेल्या भाषणातील अनेक मुद्द्यांना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला आहे. मोदीमुक्त भारत, हिंदू-मुस्लीम राजकारण आणि गुजराती पाट्या या मुद्द्यांवरुन आव्हाडांनी राज ठाकरेंचं समर्थन केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच राज यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं समर्थन केलं आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात मोठे बदल होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मराठी बोर्ड असले पाहिजे, मातृभाषेचा सन्मान, संभाजी भिडे, श्रीदेवी यांच्यावर राज ठाकरे जे बोलले ते बरोबर असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच गुजराती पाट्यांच्या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन असून वर्षानुवर्षे आम्ही जे सांगतो ते राज ठाकरे बोलल्यावर गांभीर्याने घेतलं आहे. तसेच हिंदू-मुस्लिम लढवल्याशिवाय भाजप जिंकू शकत नाही, याबाबत राज ठाकरे जे बोलले ते बरोबर असून देश तुटला तरी चालेल पण सत्ता मिळाली पाहिजे अशीच भूमिका भाजपची असल्याचंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
तसेच नार्वेकर शिवसेना चालवतात. इथे नार्वेकर येतात आणि मुख्यमंत्र्यांना भेटून पोटनिवडणुकीला पाठिंबा घेतात. तिथे संजय राऊत हातवारे करतात. नार्वेकर एक निर्णय घेतात, उद्धव ठाकरे एक निर्णय घेतात आणि सामनामध्ये काही वेगळंच चालतं त्यामुळे माझ्या मते शिवसेना मिलिंद नार्वेकर चालवतात याबाबत आमचं सर्थन असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS