15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल देण्याचे हायकोर्टाचे निर्देश !

15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल देण्याचे हायकोर्टाचे निर्देश !

मुंबई – 15 नोव्हेंबरपर्यंत मराठा आरक्षणाचा अंतिम अहवाल देण्याचे निर्देश हायकोर्टानं आज दिले आहेत. मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई हायकोर्टात आज सुनावणी झाली.यावेळी मागासवर्ग आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत हायकोर्टात अंतिम अहवाल सादर करणार असल्याची माहिती देण्यात आली. अंतिम अहवाल येईपर्यंत आयोगाच्या अहवालाबाबतचा प्रगती अहवाल दर चार आठवड्यांनी सादर करावा असंही हायकोर्टानं म्हटलं आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय नवीन शैक्षणिक वर्ष सुरु व्हायच्या आत घ्यावा, जेणेकरुन लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी मुंबई हायकोर्टात केली होती.

दरम्यान या याचिकेवरील सुनावणीदरम्यान हायकोर्टानं हे निर्देश दिले आहेत. तसेच मागासवर्ग आयोगाचा अंतिम अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत सादर करण्यात येणार असल्याची माहिती हायकोर्टात देण्यात आली आहे. त्यानंतर अंतिम अहवाल सादर करेपर्यंत दर चार आठवड्यांनी प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.

COMMENTS