तरुणाने लगावली भाजप आमदाराच्या कानशिलात !

तरुणाने लगावली भाजप आमदाराच्या कानशिलात !

नवी दिल्ली –  आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशभरातील राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. मध्य प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापलं आहे. मध्य प्रदेशात गेली 15 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. परंतु राज्यातील अनेक तरुण बेकार आहेत व हवा तेवढा राज्याचा विकास झाला नसल्याचा आरोप राज्यातील नागरिक करत आहेत. त्यामुळे याठिकाणी अनेक नागरिक संतप्त झाले आहे. अशातच भाजप आमदार आणि मंत्री सध्या जोरदार प्रचार करत आहे. या प्रचारादरम्यान नागरिकांच्या या रोषाला भाजप आमदार आणि मंत्र्याला सामोरं जावं लागत आहे.

भाजपचे मंदसौर येथील आमदार यशपाल सिंह सिसोदिया यांनाही प्रचारसभेदरम्यान नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. अलावदाखेडी गावातील प्रचारसभेदरम्यान या तरुणाने शिसोदिया यांच्या थेट कानशिलात लगावली असल्याची माहिती आहे. सिसोदिया हे गेली दहा वर्षांपासून याठिकाणी आमदार आहेत. परंतु त्यांनी त्यांच्या मतदारसंघाचा विकास केला नसल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. परंतु मानसिक संतूलन बिघडल्यामुळे आपल्या मुलाने आमदाराच्या कानशिलात लगावली असल्याचं त्या तरुणाच्या वडिलांनी म्हटलं आहे.

COMMENTS