मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी लढवणार, उमेदवारही निश्चित?

मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी लढवणार, उमेदवारही निश्चित?

मुंबई – मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लढवणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या  दुपारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांसोबत संवाद साधणार असल्याची माहिती आहे.  त्यानंतर याबाबतची घोषणा केली जाणार आहे.

दरम्यान ईशान्य मुंबई मतदारसंघात संजय दीना पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा आहे.  त्यामुळे संजय दीना पाटील यांना राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली तर  ते भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

COMMENTS