महापलिका निवडणुकीतील पराभवानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षाच्या नेत्यांची पहिली बैठक आज ‘कृष्णकुंज’ बोलवण्यात आली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनानंतर राज ठाकरे त्यांच्या व्यक्तिगत कामानिमित्त परदेशात गेले होते. त्या कालावधीत पक्षाच्या नेत्यांनी मुंबईत विभागवार बैठकांचं आयोजन करून स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून निवडणुकीतील अपयशाची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. या बैठकांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला अहवाल नेते राज ठाकरे यांना सादर करणार आहेत. त्यानंतर पक्षाच्या पुढील राजकीय वाटचालीची रूपरेषा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.
COMMENTS