उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर ?

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे येणार एकाच व्यासपीठावर ?

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे नेते नारायण राणे हे एका व्यासपीठावर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.  निम्मित ठरलयं मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमीपूजन कार्यक्रम. या कार्यक्रमाला दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार असल्याचे म्हटले जात आहे.
23 जून रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे भूमीपूजनचा कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी उपस्थीत असणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक आमदार म्हणून नितेश राणे आणि विधान परिषद आमदार नारायण राणे यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आहे. त्यामुळे नारायण राणे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसण्याची शक्‍यता आहे. नारायण राणे शिवसेना सोडून गेल्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत व्यासपीठावर येण्याची ही  पहिलीच वेळ असणार आहे.

COMMENTS