अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची माहिती

अमरनाथ दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांची माहिती

 

काश्मीरच्या अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागातील अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर सोमवारी रात्री दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला. तर तीन पोलिसांसह 32 भाविक दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेत.

मृतकांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिलांचा ही समावेश आहे. अशी माहिती, मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. उषा सोनकर आणि उर्मलाबेन ठाकोर अशी त्यांची नावे आहेत. या दोघीही पालघर येथील डहाणूच्या रहिवासी होत्या. तर जखमींमध्येही महाराष्ट्रातील 11 जणांचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी आज जम्मू-काश्मीर बंदची हाक दिली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू, रामबन, सांबा, कठूआ आणि उधमपूर येथे हायअॅलर्ट जारी करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही आज तातडीची बैठक बोलावली असून परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

या महामार्गावर रात्री सात वाजेनंतर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले. तसेच या बसची नोंदणी नव्हती अशी माहिती समोर येत आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची आणि बसची नोंदणी केली जाते. नोंदणी केलेल्या बसला सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे दहशतवाद्यांनी याच बसला लक्ष्य केल्याचे उघडकीस आले आहे.

COMMENTS