बसप प्रमुख मायावतींचा खासदारकीचा राजीनामा मंजूर

बसप प्रमुख मायावतींचा खासदारकीचा राजीनामा मंजूर

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचा खासदारकीचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. ‘भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, तसेच मला राज्यसभेत सत्ताधारी पक्ष बोलू देत नाही’, असा आरोप करत मायावती यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता.
भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, या आरोपावर भाजपने आक्षेप घेत मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी केली. मला सभागृहात बोलू दिले नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा मायावतींनी दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपचे खासदार काही केल्या ऐकायला तयार नव्हते. त्यामुळे मायावती यांनी सभात्याग केला होता. त्यानंतर त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. हा राजीनामा आज मंजूर करण्यात आला.

COMMENTS