अपघातग्रस्तांच्या मदतीला शरद पवार आले धावून !

अपघातग्रस्तांच्या मदतीला शरद पवार आले धावून !

नागपूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून आपल्यातील माणुसकीचं दर्शन घडवलंय. त्यांच्या गडचिरोली दौऱ्यावेळी हा प्रकार घडला. 

शरद पवार हे नागपूरहून गडचिरोलीला जात असताना भिवापूरजवळ एका गाडीला अपघात झालेला त्यांना दिसला. गाडी थांबवून ते अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले. शरद पवारही स्वत: गाडीतून उतरुन जखमींना मदत केली. अपघातग्रस्त गाडीचा दरवाजा उघडला जात नसल्यामुळे जखमींना बाहेर काढायला त्रास होत होता. तेव्हा स्वतः पवारांनी जखमींना बाहेर काढायला मदत केली. गाडीत अडकलेल्या पाच जणांच्या कुटुंबाला शरद पवारांनी बाहेर पडायला मदत केली.

मदतीनंतर पवार आपल्या दौऱ्यावर रवाना झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

COMMENTS