महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा !

मुंबई  राज्याचे महाधिवक्ता असलेले आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या विधी आणि न्याय विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे पहिल्यांदाच महाधिवक्त्याला राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांशी संबंधित सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालयासह इतर न्यायालयात राज्याची न्यायिक बाजू मांडण्यासाठी महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात येते. सध्या महाधिवक्ता पदावर असलेल्या आशुतोष कुंभकोणी यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा मिळाला आहे.

दरम्यान राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, पंढरपूर देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यानंतर आता महाधिवक्त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे यापुढे आता महाधिवक्त्याला राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे.

COMMENTS