नाशिक – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाला जिल्हा निबंधकांनी नोटीस बजावली होती. त्यानुसार सहकार खात्याने संचालक मंडळावर ठपका ठेवत बरखास्तीची कारवाई केली. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासक धुरा घेणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्जाच्या रकमेची थकबाकी, अंशदानाची रक्कम मुदतीत न भरणे, अनावश्यक जाहिरातींवर केलेला खर्च, अनावश्यक रोजंदारीचे कामगार नियुक्ती आदींसह एकूण दहा कारणांच्या आधारे बाजार समितीच्या संचालक मंडळाला नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर संचालक मंडळावर ठपका ठेवून ते बरखास्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांनी जिल्हा निबंधकांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितीली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने बरखास्तीच्या कारवाईपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतीत पुन्हा न्यायालयात दाद मागण्याची मुदत संचालक मंडळाला दिली होती. त्यानुसार संचालक मंडळ हे उच्च न्यायालयात धाव घेणार आहे. सदर कारवाईनंतर बाजार समितीच्या मुख्य कार्यालय परिसरात शुकशुकाट जाणवत होता मात्र दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू आहेत.
COMMENTS