नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त !

नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त !

नाशिक – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ अखेर बरखास्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानंतर विभागीय सहनिबंधक मिलींद भालेराव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचं  आर्थिक नुकसान केल्याबद्दल संचालक मंडळावर आरोपपत्र निश्चित करण्याची तयारी सुरू होत नाही तोच संचालक मंडळावरी कारवाई झाल्याने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विभागीय सहनिबंधक मिलींद भालेराव यांनी बँकेत जाऊन पदभार स्वीकारल्यानंतर बँकेचे अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या दालनाला मंडळ बरखास्त केल्याचे पत्रकही प्रसिद्ध करण्यात आले आहे. बँकेचा वाढलेला एनपीए व आर्थिक अनियमितता या दोन गंभीर महत्वाच्या मुद्याांच्या आधारे सहकार अधिनियमाव्दारे कारवाई करण्यात आली आहे. नुकतीच भाजपचे केदा आहेर यांची बिनविरोध जिल्हा बँकेत वर्णी लागली होती. त्यामुळे काही इच्छुकांमध्ये नाराजी होतीच, परंतु अवघ्या आठ दिवसातच आहेर यांना या पदावरूनच नव्हे तर संचालकपदावरूनही पायऊतार व्हावे लागले आहे. सहकार विभाग आता कशा प्रकारे कारवाई करते याकडे जिल्हा वासियांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS