कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज बिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

30 ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-2017 ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना 7 नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता 15 नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल 15 नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.

15 नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. तसेच मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर 2017 ते डिसेंबर 2018 या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या.  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना2017 चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज माफ होणार आहे.

COMMENTS