राहुल गांधी यांचा ‘मार्शल आर्ट‘ !

राहुल गांधी यांचा ‘मार्शल आर्ट‘ !

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मार्शल आर्ट शिकत असतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात त्यांना बॉक्सर विजेंदर सिंग यांनी खेळात सक्रीय असण्याबद्दल प्रश्न विचारला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनी आइकिडो खेळात आपण ब्लॅक बेल्ट असल्याचे सांगितले होते. याचबरोबर ते तलवारबाजीत देखील पारंगत आहेत. त्यानंतर राहुल गांधींचे आइकिडोचा सराव करतानाचे फोटो काँग्रेस कार्यकर्त्याने ट्विटरवर शेअर केले आहेत.

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे मार्शल आर्ट शिकत असतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या खुप व्हायरल झाले आहेत. या फोटोत राहुल गांधी आइकिडो प्रशिक्षक सेंसेई कर यांच्याकडून मार्शल आर्टचे धडे गिरवताना दिसत आहेत.

COMMENTS