आम आदमी पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

आम आदमी पक्षाकडून विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर!

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 साठी आज आम आदमी पक्षाच्यावतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातून अनेक इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने राज्य पक्ष कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांच्याशी कमिटी यांच्याशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने उमेदवारांची यादी तयार केली आहे.

आम आदमी पार्टीची उमेदवारांची पहिली यादी

1. पारोमिता गोस्वामी (49) (ब्रम्हपुरी विधानसभा, चंद्रपूर जिल्हा)

अॅड. पारोमिता गोस्वामी या गेल्या 20 वर्षांपासून विदर्भातल्या खेड्या-पाड्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी काम करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आदिवासीयांच्या जमीनेचे हक्क व वन हक्क, तसेच महिला व बालकांच्या मुद्द्यांवर सातत्यपूर्ण चळवळीचे नेतृत्व त्यांनी केली आहे. IBN Lokmat कडून दिल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्रीयन ऑफ द यअर’, YCMOU द्वारे दिल्या जाणाऱ्या ‘महात्मा गांधी व्यसनमुक्ती’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पारोमिता यांना येल विद्यापीठाच्या जागतिक फेलोशिप व अशोक फेलोशीप दिली गेली आहे.

शिक्षण: बी.ए. सेंट झेव्हिअर कॉलेज, कोलकाता. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सस मधून मास्टर्स इन सोशल वर्क व नागपूर विद्यापीठातून एल.एल.बी

2. विठ्ठल गोविंद लाड (57) (जोगेश्वरी पूर्व विधानसभा, मुंबई)

विठ्ठल गोविंद लाड हे कष्टकरी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ही संघटना दलित-आदिवासी व शेतकऱ्यांसाठी मागील 36 वर्षे काम करत आहे. त्यांनी श्रमिक मुक्ती आंदोलनाद्वारे आरेतील जमिनीच्या न्याय वाटपासाठी काम केले व 10 जिल्हातील स्थानिक लोकांच्या चळवळीचे नेतृत्व केले आहे. लाड मागील 7 वर्षांपासून आम आदमी पक्षासोबत कार्यरत आहे व यापूर्वी राज्य कार्यकारिणी समिती सदस्य तसेच पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम केले आहे.

3. डॉ. आनंद गुरव (40) (करवीर विधानसभा, कोल्हापूर जिल्हा)

डॉ. आनंद दादु गुरव आयुर्वेदिक डॉक्टर व बालरोग तज्ञ आहेत. करवीर मतदारसंघात त्यांनी शेकडो आरोग्य शिबिरे घेतली आहेत. सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम घेतले आहेत. वैद्यकीय शास्त्रात त्यांचे अनेक पुस्तके प्रकाशित झाले आहेत.

शिक्षण: बी. ए. एम. एस, एम. डी.

4. विशाल वडघुले (29), (नांदगाव विधानसभा, नाशिक जिल्हा)

विशाल वडघुले ऑटो-मेकॅनिक आहेत. 2013 पासून ते आम आदमी पक्षासोबत काम करत आहेत. वडघुले सध्या पक्षाचे नांदगाव तालुका अध्यक्ष आहेत. त्यांच्या सार्वजनिक जीवनात त्यांनी शेतकऱ्यांच्या मुद्यांवर अनेक आंदोलने केली आहेत. नांदगावच्या नार-पार आंदोलनाचे त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे.

5. डॉ अभिजित मोरे (35), (कोथरूड विधानसभा, पुणे जिल्हा)

डॉ. अभिजीत मोरे हे उच्चविद्याविभूषित असून पुण्यातील नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पदवीधर झालेले आहेत. ते सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परवडण्याजोगी चांगली सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, रुग्ण हक्क याकरिता काम करतात. डॉ.अभिजीत मोरे हे जनआरोग्य अभियान- महाराष्ट्र या राज्यस्तरीय आरोग्य कार्यकर्ते व सामाजिक संस्थांच्या नेटवर्कचे राज्य सहसंयोजक आहेत. पुण्यातील कोथरुडमधील उदघाटन होऊनही गेली 8 वर्षे बंद असलेले कै बिंदुमाधव बाळासाहेब ठाकरे रुग्णालय सुरु करण्याकरिता त्यांनी यशस्वी बेमुदत उपोषण केले आणि प्रशासनाला रुग्णालय पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय घेण्यास भाग पाडले. तसेच शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पुण्यात झालेल्या पालकांच्या मोठ्या आंदोलनाच्या अग्रभागी राहून योगदान दिले आहे. पुण्यातील त्यांच्या आरोग्य क्षेत्रातील कामगिरीकरिता त्यांना अशोक मनोहर युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

शिक्षण: एम. बी. बी. एस., पदव्यूत्तर शिक्षण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट

6. सिराज खान (47), (चांदीविली विधानसभा, मुंबई)

सिराज खान हे एक यशस्वी उद्योजक आहेत. उद्योग क्षेत्रात त्यांचा चांगला परिचय असून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल मुलांच्या शिक्षणाकरिता ते नेहमी कार्यरत असतात. सिराज खान हे आम आदमी पक्षाच्या वाहतूक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असून पक्षाच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत.

7. दिलीप तावडे (६१) (दिंडोशी विधानसभा, मुंबई उपनगर)

दिलीप तावडे हे उद्योजक आहेत. कामगार चळवळीत अनेक वर्षे त्यांनी कामगार नेते मगणून कार्य केले आहे. ते आम आदमी पक्षात २०१३ पासून कार्यरत आहेत आणि पक्षाचे जमिनीवरील सक्रिय कार्यकर्ते आहेत. दिंडोशी परिसरात गेल्या ३० वर्षांपासून विविध सामाजिक क्षेत्रात ते सक्रिय सहभागी आहेत. आरे परिसरातील आदिवासींच्या घरांसाठी तसेच मुंबईतील महागड्या वीज प्रश्नी त्यांनी अनेक आंदोलने केली आहेत.

8. संदीप सोनावणे (32) (पर्वती विधानसभा, पुणे जिल्हा)

संदीप सोनावणे हे आम आदमी पक्षाचा युवा चेहरा आहेत. ते सध्या आप युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. गेल्या १० वर्षांच्या आपल्या सामाजिक चळवळीत त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. पुण्यातील महिला बचत गटाच्या आंदोलनाचे यशस्वी नेतृत्व देखील त्यांनी केले आहे. शिक्षणहक्क चळवळीत संदीप सोनावणे यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे त्यामाध्यमातून जवळपास २३००० गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळाला आहे.

शिक्षण: बी ए एल एल बी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

COMMENTS