जनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प –अजित पवार

जनतेची निराशा करणारा अर्थसंकल्प –अजित पवार

मुंबई – 2017-18 चा अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सादर केला आहे. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. सातव्या वेतन आयोगाबाबत ठोस घोषणा केली नसून बक्षी समितीचा अहवाल आल्यानंतर आयोग लागू केला जाणार आहे. तसेच त्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतुद केलेली आहे, मात्र किती तरतुद केली त्याबाबत सांगितले नाही. १७ लाख २७ हजार सरकारी कर्मचारी – अधिकाऱ्यांचे या घोषणेकडे लक्ष लागले होते परंतु त्यांची घोर निराशा झाली असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.

दरम्यान या अर्थसंकल्पात कोणत्याही बाबतीत ठोस तरतुद केली नसून शेतक-यांसाठी तरतुद नसल्याचं वक्तव्य माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी केलं आहे. मी 10 पैकी अर्थसंकल्पाला 3 मार्क देईन असंही त्यांनी म्हटलं आहे. अभूतपूर्व अशी महसुली तूट या अर्थसंकल्पात नसून सुरुवातीला अर्थमंत्री हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पाया पडले. एक प्रकारे त्यांनी महाराजांची माफ़ी मागीतली की त्यांच्या नावाने शेतकरी कर्जमाफीच्या निमित्ताने जनतेला फसवले जात असल्याची टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.

COMMENTS