तुम्ही अहवाल मांडा आमचे पूर्ण समर्थन असेल – अजित पवार

तुम्ही अहवाल मांडा आमचे पूर्ण समर्थन असेल – अजित पवार

मुंबई –  मराठा आरक्षणाबाबत तोडगा काढण्यासाठी विधीमंडळात सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. त्यानंतर मराठा आरक्षणावर आम्ही ठाम आहोत, त्यामुळे यामध्ये विरोधकांनी अडथळा आणू नये असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणासाठी आम्ही टोकाची मागणी करतोय असं नाही. मराठा समाजाने इतर मागण्यांसह आरक्षणासाठी लाखो संख्येचे मोर्चे काढले. आतपर्यंत अनेक अहवाल आले ते मांडले नाही असं सरकार म्हणतंय, पण हा अहवाल वेगळा असल्याचं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे. आम्हाला खोडा घालायचा नाही.

अहवाल न ठेवल्याने त्या अहवालात काय आहे हे आम्हाला कसे कळणार जनतेने आम्हालाही निवडून दिलं आहे. तुम्ही अहवाल मांडा आमचे पूर्ण समर्थन असेल, आम्हाला राजकारण करायचे नाही. तसेच धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबतही सरकारने कार्यवाही करावी अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली आहे.

COMMENTS