शरद पवार – राजू शेट्टी एकत्र, अजित पवारांचे सूचक विधान !

शरद पवार – राजू शेट्टी एकत्र, अजित पवारांचे सूचक विधान !

बारामती – प्रजासत्ताक दिनानिमित्त काढण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत  कट्टर विरोधक असलेले शरद पवार आणि राजू शेट्टी एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चेला उधाण आलं आहे. याबाबत अजित पवार यांनीही सूचक विधान केलं असून राजकीय जीवनात बदल होत असतात असं अजितदादांनी म्हटलं आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे राजू शेट्टी आणि शरद पवार हे आगामी काळात एकत्र दिसणार का याबाबतची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

26 जानेवारी रोजी मुंबईत काढण्यात आलेल्या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी एकत्र आले होते. त्यामुळे या दोन्ही दिग्गज नेत्यांमधील राजकीय वाद मिटला असून संभाव्य आघाडी होणार का अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे. गेली अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद होता. याबाबत अजित पवारांना विचारलं असता राजकीय जीवनात बदल होत असतात असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राजू शेट्टी आणि शरद पवार एकत्र दिसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.

 

COMMENTS