उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशातील एका महापालिकेतील शपथविधीदरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं पहावयास मिळालं आहे. हा गोंधळ महापौरांच्या शपथविधीवरुन झाला होता. अलिगढ महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या महापालिकेच्या नवनियुक्त नगरसेवक आणि महापौरांचा काल शपथविधी सोहळा पार पडला. या शपथविधीदरम्यान समाजवादी पार्टीचे नगरसेवक मोहम्मद फुरकान यांनी महापौरपदाची शपथ उर्दूमधून घेतली. त्याला भाजप कार्यकर्त्यांनी त्यावेळी विरोध केला आणि एकच गोंधळ उडाला.
बसपाचे नगरसेवक मोहम्मद फुरकान यांची निवड महापौरपदी करण्यात आली आहे. दरम्यान त्यांची त्यांची मातृभाषा उर्दू असल्यामुळे त्यांनी उर्दूमधून शपथ घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याला विरोध करीत तेथे उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन कार्यक्रमात गोंधळ घातला. या प्रकाराची अलिगढ प्रशासनाने गंभीर दखल घेतली. दोषींवर योग्य कारवाई करणार असल्याची माहिती अलिगढचे जिल्हादंडाधिकारी हृषिकेश भास्कर यशोद यांनी दिली आहे.
COMMENTS