अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेंचा साखरपुडा संपन्न, कार्यक्रमाला कोणी कोणी लावली उपस्थिती?

अमित ठाकरे आणि मिताली बोरुडेंचा साखरपुडा संपन्न, कार्यक्रमाला कोणी कोणी लावली उपस्थिती?

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांचा साखरपुडा संपन्न झाला. अमित ठाकरे आणि त्यांची मैत्रिण मिताली बोरुडेचा साखरपुडा महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबमध्ये सोमारी पार पडला. या कार्यक्रमाला अमित आणि मिताली यांच्या कुटुंबियांसह त्यांच्या काही मोजक्याच नातेवाईकांनी उपस्थिती लावली.

अमित ठाकरे आणि मिताली यांच्या साखरपुडा सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून चंदूमामा वैद्य आणि कुटुंबीय, कुटुंब सदस्य स्मिता ठाकरे आणि पुत्र राहुल, राज यांची बहीण जयजयवंती ठाकरे आणि कुटुंबीय, मनसे नेते बाळा नांदगावकर आणि कुटुंबीय, तसेच मनसे नेते नितीन सरदेसाई आणि कुटुंबीय, कौटुंबिक मित्र राजन शिरोडकर आणि कुटुंबीय, अविनाश गोवारीकर, फॅशन फोटोग्राफर, नयन शाह आणि कुटुंबीय, जयेश गांधी आणि कुटुंबीय या मान्यवरांनी उपस्थिती लावली.

अमित यांच्या साखरपुड्याला मोजक्याच नातेवाईकांनी उपस्थिती लावल्याचं आढळून आलं आहे.तसेचे उद्धव ठाकरे उपस्थित राहणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. परंतु उद्धव ठाकरेंनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिली लावली नसल्याचं दिसून आलं आहे.

 

COMMENTS