अमित शाहांच्या सभेत गोंधळ, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ !

अमित शाहांच्या सभेत गोंधळ, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी, पाहा व्हिडीओ !

कर्नाटक – कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच सर्वच पक्षांनी जोरदार सभांचा धडाका सुरु केला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह देखील प्रचारसभा घेत आहेत. आज मैसूरमध्ये सुरु असलेल्या अमित शाहांच्या सभेत दलित कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला असल्याचं पहावयास मिळालं आहे. तसचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी संविधानाविरोधात केलेल्या वक्तव्याचा या कार्यकर्त्यांनी निषेध केला आहे.

 

दरम्यान अमित शाह यांच्या सभेचं आयोजन मैसूरमधील राजेंद्र कलामंदिर याठिकाणी करण्यात आलं होतं. यादरम्यान अमित शाह यांच्या भाषणाला सुरुवात होताच. सभेत बसलेल्या काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. दलित कार्यकर्त्यांनी केलेल्या या घोषणाबाजीमुळे अमित शाह यांना आपले भाषण थांबवावं लागलं. तसेच या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांचा निषेध केला आहे. काही वेळानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे. या कार्यकर्त्यांच्या गोधळामुळे त्याठिकाणचं वातावरण चांगलंच तापलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

COMMENTS