भाजपकडून अभिनेत्री माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर ?

भाजपकडून अभिनेत्री माधुरी दीक्षितला राज्यसभेची ऑफर ?

मुंबई अभिनेत्री माधुरी दीक्षितला भाजपनं राज्यसभेची ऑफर दिली असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असल्याचं दिसून येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज माधुरी दीक्षितची घरी जाऊन भेट घेतली आहे. त्यामुळे माधुरीला भाजपनं राज्यसभेची ऑफर दिली असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. परंतु अशाप्रकारची ऑफर दिली नसल्याचं भाजपनं म्हटलं आहे.

दरम्यान आज अमित शाह हे मुंबईच्या दौ-यावर आले असून यादरम्यान त्यांनी दुपारी एकच्या सुमारास माधुरी दीक्षितची भेट घेतली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, भाजपचे सरचिटणीस अनिल जैन हे उपस्थित होते.
संपर्क फॉर समर्थन या अभियाना अंतर्गत यापूर्वी अमित शाह यांनी कपिल देव यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली असल्यामुळे चर्चेला उधाण आलं असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS