मुंबई – काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र आहेत. राजकीय उतार चढावामुळे मी दुखावलो गेलो होतो. म्हणून त्यांनी मित्रत्वाच्या नात्याने मला काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली होती असा गौप्यस्फोट अर्जुन खोतकर यांनी केला आहे. अब्दुल सत्तार हे माझे अनेक वर्षांपासूनचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी मी त्यांच्या बोलावण्यामुळे चहा घेण्यासाठी गेलो होतो. आमच्यात राजकीय घडामोडीवर चर्चा झाल्यामुळेच सत्तार हे गुड न्यूज देण्याचे भाकीत करत होते. मात्र मी शिवसेना सोडणार नाही असे अर्जुन खोतकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान गेली अनेक दिवसांपासून दानवे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचा पवित्रा घेणारे अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली आहे. आपण कडवट शिवसैनिक असल्याने आपण रावसाहेब दानवे यांचे काम करून युतीचा धर्म पाळणार आहे. तसेच रावसाहेब दानवे यांना निवडणुकीत कसलाही दगाफटका करणार नाही असे देखील अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.
COMMENTS