उस्मानाबाद – गेल्या साडेतीन वर्षात शिवसेनेचे तीन पालकमंत्री जिल्ह्याला मिळाले. डॉ. दिपक सावंत हे विधान परिषदेवरील सदस्य होते. त्यामुळे त्यांचा आणि जनतेचा कधीच संपर्क झाला नाही. शिवसैनकांचीही कामे त्यांच्याकडून होत नव्हती. त्या तक्रारी मुंबईत मातोश्रीपर्यंत पोहचल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलावे लागले. त्यानंतर परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे पालकमंत्रीपद गेले. रावते यांच्याकडे पालकमंत्री आल्यानंतर शिवसैनिकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र झाले उलटेच. जिल्ह्यातील मात्तबर नेते आणि रावते यांचे सूत कधीच जुळले नाही. रावते, खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि आमदार तथा संपर्कप्रमुख प्रा. तानाजी सावंत यांच्यात तिहेरी सुप्त संघर्ष सुरू राहिला. खासदार गायवाड यांनी दोन वेळा आमदार आणि एकदा खासदार म्हणून निवडूण आले आहेत. मात्र खासदार झाल्यानंतर त्यांनी कधीच जिल्ह्यात फिरकले नाहीत. सर्व पदे मिळले आहेत, आता काय नको, अशा अविर्भावात वावरत असावेत, अशी चर्चा शिवसैनिकात सुरू
आहे. तर जिल्हा परिषदेतील सत्ताही त्यांच्यामुळेच गमवावी लागल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान पूर्वीच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी शिवसैनिकांना विश्वासात घेतले नाही. विशेष म्हणजे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामे झाली
मात्र शिवसैनिकांची निराशा होत गेली. त्यामुळे दोन्ही पालकमंत्र्यांना जिल्ह्यातून बदलून जावे लागले. आता खोतकर यांच्याकडे जिल्ह्याचे
पालकमंत्रीपद आले आहे. यापूर्वीही 1993 मध्ये त्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले होते. नव्याने पुन्हा एकदा त्यांच्याकडे
सुत्रे आल्याने शिवसेनेतील मरगळ झटकण्यात ते कितपत यशस्वी होतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
COMMENTS