प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे विरोधकांच्या ऐक्याला सुरूंग ?

प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेमुळे विरोधकांच्या ऐक्याला सुरूंग ?

मुंबई – भारिप बहुजन महासंघाचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी पक्षाच्या झालेल्या बैठकीनंतर आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी न करण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच वेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. पवार हे जातीयवादी आहेत. त्यांनी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना वाचवण्यासाठी प्रय़त्न केले असा आरोपही त्यांनी पवारांवर केला. त्यांनी 2001 मध्ये मिलिंद एकबोटे यांना मोका लावण्याची शिफारस करण्यात आली होती. मात्र पवारांनी ते होऊ दिलं नाही असंही आंबेडकर म्हणाले.

           याच पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही टीका केली. तसंच आगामी निवडणुकीत डाव्यांसोबत जाऊ असंही स्पष्ट केलं. त्यामुळे भाजप विरोधी मोट बांधण्याच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रय़त्नांना आंबेकर यांच्या भूमिकेमुळे काही प्रमाणात का होईना सुरूंग लागला जाईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा व्यक्त केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप सरकाविरोधात तयार होत असलेलं जनमत, विविध समाजघटकांची भाजपवरची नाराजी हे ओळखून दोन्ही काँग्रेसनं भाजपला घेरण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रकाश आंबेडर यांच्या या भूमिकेमुळे त्याला तडा जाण्याची शक्यता आहे.

               आंबेडकर यांनी डाव्यांच्यासोबत तिस-या आघाडीचा प्रयत्न केल्यास धर्मनिरपेक्ष मतांमध्ये फूट पडू शकते. कोरेगाव भीमा प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे दलित समाजाच्या त्यांना पाठिंबा वाढल्याचं चित्र आहे. रामदास आठवले हे सरकारमध्ये मंत्री असल्यामुळे ते या प्रकरणी सरकारविरोधात फारसे बोलू शकत नाही. त्यामुळे दलित जमाजामध्ये आठवलेंविषयी नाराजी आहे. ती नाराजी इनकॅश करण्यामध्ये प्रकाश आंबेडकर ब-यापैकी यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच त्यांनी डाव्यांसोबत वेगळा लढण्याचा निर्णय घेतला तर भाजपला फायदा होऊ शकतो.

COMMENTS