अशोक चव्हाण नांदेडमधून लढवणार लोकसभा निवडणूक ?

अशोक चव्हाण नांदेडमधून लढवणार लोकसभा निवडणूक ?

मुंबई – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पक्षश्रेष्ठींनी आग्रह केल्यामुळे चव्हाण हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे. प्रदेशाध्यक्ष निवडणूक लढवत नसतील तर चुकीचा संदेश जाईल त्यामुळे चव्हाण यांनी निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींनी केला असल्याची माहिती आहे.

दरम्यान अशोक चव्हाण हे विधानसभा निवडणुकीसाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. परंतु चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढवावी असा आग्रह पक्षश्रेष्ठींनी केल्यामुळे अशोक चव्हाण हे लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS