भाजपच्या पाच ते सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट?

भाजपच्या पाच ते सहा विद्यमान खासदारांचा पत्ता कट?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या यादीत राज्यातील विद्यमान पाच ते सहा खासदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. या बैठकीत ही यादी जाहीर केली जाणार आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची पहिली फेरी पूर्ण झाली असून आज दुसरी फेरी होणार आहे. या बैठकीत भाजप अध्यक्ष अमित मतदारसंघनिहाय चर्चा करणार आहेत.

दरम्यान या पाच ते सहा खासदारांमध्ये ईशान्य मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचही नाव असल्याची माहिती आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा सोमय्या यांनाा तीव्र विरोध आहे. शिवाय भाजपच्या विद्यमान आमदारांचाही सोमय्यांना विरोध असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या या यादीकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS