लवकरच बीएमसीत दोन आयुक्त?

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा होणारा विस्तार आणि वाढणारी लोकसंख्या पाहता बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी दोन आयुक्त असणं गरजेचे आहे, अशी मागणी मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केली आहे. अस्लम शेख यांनी राज्य शासनाच्या शहर विकास विभागाकडे याबाबतची मागणी केली आहे. तसेच लवकर यावर निर्णय होण्याची शक्यता आहे

शेख यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. त्यामुळे मुंबईची लोकसंख्या वाढत आहे. याचा परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. पण सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरीकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात.

ज्या पध्दतीने मुंबई शहर आणि उपनगर असे दोन जिल्हाधिकारी आहेत. त्याचप्रमाणे आयुक्त असावेत. तसेच मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते. यामुळे नागरिकांची गैरसोय होते. यामुळे मुंबई शहर आणि उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणं गरजेचे आहे.

COMMENTS