औरंगाबाद मनपा निवडणूक काॅंग्रेस स्वबळावर लढणार – अमित देशमुख

औरंगाबाद मनपा निवडणूक काॅंग्रेस स्वबळावर लढणार – अमित देशमुख

मुंबई – आगामी काळात औरंगाबाद महानगर पालिकेची निवडणूक होणार आहे. त्याअनुशंगाने काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांची मुबंई येथील काॅंग्रेस भवनात बैठक झाली. यावेळी काॅंग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी सोबत निवडणूक लढविण्याची तयारी दाखवल्यास त्यावेळी निर्णय घेता येईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

 

 

COMMENTS