…तर विरोधी पक्षनेते पद सांभाळण्यास मी तयार – बाळासाहेब थोरात

…तर विरोधी पक्षनेते पद सांभाळण्यास मी तयार – बाळासाहेब थोरात

मुंबई – सुजय विखे पाटलांच्या भाजपा प्रवेशावर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि राधाकृष्ण विखेंचे विरोधक समजले जाणारे बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऱाधाकृष्ण विखे पाटलांनी सुजय विखेच्या भाजपा प्रवेशाबाबत समोर येवून सर्वप्रथम निषेध व्यक्त करावयास हवा होता. ते सांगतात की पक्ष सांगेल ते मी काम करेल मात्र ते सुजयला का रोखू शकले नाहीत याचं स्पष्टीकरण त्यांना द्याव लागेल असं थोरात यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत विखे कुटुबीयांना भरभरुन दिलय. मात्र केवळ पुत्र हट्ट करतो म्हणून त्याने दुस-या पक्षात जाणे हे विखेंना शोभणारं काम नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे यांनी सुजयला समजून सांगायला हव होतं. विखेंना उलट काँग्रेसने आतापर्यंत दिलेल्या पदाबद्दल उत्तराई होण्याची ही वेळ होती. मात्र तसं विखेंनी केललं दिसून येत नाही. विखे घराण्याचं हे वागणं अहमदनगरच्या जनतेलाही पटणार नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

राधाकृष्ण विखेंनी राजीनामा देवून ते भाजपात गेले तर पक्ष म्हणेल तर मी विरोधी पक्षनेते पद सांभाळण्यास तयार आहे. मात्र मी पक्षाकडे आतापर्यंत स्वतःसाठी काही मागीतलं नसल्याचंही यावेळी थोरात यांनी म्हटलं आहे.

COMMENTS