नाणारबाबत शिवसेना-भाजपची ‘मॅच फिक्सिंग’ –विखे-पाटील

नाणारबाबत शिवसेना-भाजपची ‘मॅच फिक्सिंग’ –विखे-पाटील

मुंबई  ‘कोकणातील नाणार प्रकल्पाबाबात शिवसेना आणि भाजपमध्ये ‘मॅच फिक्सिंग’ केली असल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे. तसेच या प्रकल्पाविरोधात शिवसेनेचे आंदोलन म्हणजे भाजपशी केलेल्या एका ‘डिल’चा भाग असून, हे भाजप-शिवसेनेचे ‘मॅच फिक्सिंग’ असल्याचं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे. मुळात केंद्र सरकारला नाणारचा प्रकल्प गुजरातला पळवायचा असून हा प्रकल्प आपल्या काळात गुजरातमध्ये गेल्याचे पाप माथी यायला नको म्हणून भाजपने शिवसेनेला हाताशी धरले असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे.

दरम्यान दोन्ही पक्षांच्या संगनमताने ठरलेल्या रणनितीनुसार शिवसेनेने प्रकल्पाला विरोध करायचा आणि भाजपने सुरुवातीला या प्रकल्पाची रदबदली करुन काही काळाने जनमताचा आदर करीत असल्याची सबब सांगायची आणि हा प्रकल्प रद्द करायचा असल्याचा आरोपही विखे-पाटील यांनी केला आहे. ‘या प्रकरणामध्ये भाजप-शिवसेना दोघेही मिळून जनतेला मूर्ख बनवू पअसल्याचंही विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS