भाजपसाठी खूशखबर, अमित शाहांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण !

भाजपसाठी खूशखबर, अमित शाहांचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण !

नवी दिल्ली – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या नवीन मुख्यालयाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. दिल्लीतील दीनदयाल उपाध्याय मार्गावर भव्यदिव्य मुख्यालय उभारण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 18 फ्रेब्रुवारी रोजी या मुख्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.

दरम्यान अमित शाह यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या मुख्यालयात अत्याधुनिक सोयी सुविधा असणार आहेत. हे मुख्यालय पाच मजल्यांचं आहे. भाजपच्या या मुख्यालयाला दोन विंग असून त्यामध्ये ७० खोल्या आहेत. मुख्यालयात पक्षाध्यक्ष, नेते आणि खासदारांसाठी विशेष कक्ष आहेत. ८००० चौरस मीटरवर या दोन इमारती उभारल्या असून याशिवाय २ सभागृहही आहेत. ज्यांची आसन क्षमता ४५० एवढी आहे. आठ कॉन्फरन्स रुम्सही या मुख्यालयात असून ज्यात व्हिडीओ कॉन्फरन्सची सुविधेसह डिजीटल सिक्युरिटी सिस्टम आणि डिजीटल लायब्ररी, सर्व परिसर वायफाययुक्त असून ख्यालयाचे गेट स्वयंचलित आहेत जे फक्त RF टॅग असलेल्या वाहनांसाठीच उघडले जाणार आहेत. २०० वाहनांसाठी पार्किंगच्या सुविधेसह बायो टॉयलेट आणि कॅफेटेरियाही या मुख्यालयात आहे.

COMMENTS