पात्रता असणारे बाहेर आहेत तर अपात्र लोक सत्तेत बसलेत –एकनाथ खडसे

पात्रता असणारे बाहेर आहेत तर अपात्र लोक सत्तेत बसलेत –एकनाथ खडसे

जळगाव – ज्यांची पात्रता आहे ते बाहेर आहेत आणि ज्यांची पात्रता नाही ते सत्तेत बसले आहेत अशी जोरदार टीका भाजपवर नाराज असलेले माजी मांत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. भोरगाव लेवा पंचायतीच्यावतीने पाडळसे येथे लेवा पाटील समाजाचे राष्ट्रीय महाअधिवेशन आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. सरदार वल्लभभाई पटेल हे या देशात जन्माला आले हे भाग्य आहे, त्यांच्या कार्यामुळे ते लोहपूरुष ठरले व त्यांच्या पात्रतेमुळेच ते तिथपरंयत पोहचले. परंतु आजची परिस्थिती उलटी असून ज्यांची पात्रता नाही ते त्याठिकाणी बसले आहेत असंही खडसेंनी म्हटलं आहे.

गेली काही दिवसांपासून नाराज असलेले एकनाथ खडसे काँग्रेसच्या संपर्कात असल्यात बोललं जात आहे. त्यामुळे एकनाथ खडसे काय बोलतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. त्यातच खडसे यांनी आणकी एक वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असल्याचं दिसत आहे.

COMMENTS