फाईल चोरीप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक, चोरी सीसीटीव्हीत कैद !

फाईल चोरीप्रकरणी भाजप नगरसेवकाला अटक, चोरी सीसीटीव्हीत कैद !

उल्हासनगर – उल्हासनगर महापालिकेतील भाजपच्या स्वीकृत नगरसेवकला फाईल लंपास केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. प्रदीप रामचंदानी असं स्वीकृत नगरसेवकाचं नाव असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कपाटातून फाईल काढून नेली असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. याप्रकरणी प्रदीप रामचंदानी  याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान सीसीटीव्हीतील दृश्यानुसार रामचंदानी याने फाईल कपाटातून काढून ती फाईल शर्टातून लपवून नेल्याचं समोर आलं आहे. तसेच रामचंदानीचा मुलगा पालिकेचा मोठा ठेकेदार असून रामचंदानी याला डोंबिवलीतील भाजपच्या बड्या नेत्याचं पाठबळ आहे. त्यामुळे ही महत्त्वाची फाईल रामचंदानी याने लंपास केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच या चोरीप्रकरणी आता रामचंदानीच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

COMMENTS