भाजपमध्ये राहूनच भांडणार, योग्य वेळी निर्णय घेईन – नाना पटोले

भाजपमध्ये राहूनच भांडणार, योग्य वेळी निर्णय घेईन – नाना पटोले

नागपूर- संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आपण राहुल गांधी यांची भेट घेणार अाहाेत. मात्र, तूर्तास भाजपमध्येच राहून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पक्षाशी भांडणार असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे खासदार नाना पटाेले यांनी दिले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी अमरावतीच्या सभेत आपल्याला जाहीर निमंत्रण दिले आहे. असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी हे बहुजनांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळेच त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. मात्र, सरकारची कामगिरी निराशाजनक राहिली. शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग मान्य केला गेला नाही. ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या मिळत नाहीत. त्यामुळे हे सरकार बहुजनांचे कसे?’ असा प्रश्न पटाेले यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पटोले यांनी अकोल्यात 1 डिसेंबर रोजी शेतकरी परिषदेचे आयोजन केले असून या परिषदेला भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा हजेरी लावणार आहेत.

 

 

COMMENTS