भाजपला जोरदार धक्का ज्येष्ठ नेत्याचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

भाजपला जोरदार धक्का ज्येष्ठ नेत्याचा कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश !

बीड – आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आतापासूनच जोरदार तयारीला लागले असल्याचं दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे. पक्षातील अनेक नत्यांची आणि कार्यकर्त्यांची आवक जावक सुरु झाली आहे. भाजपला सोडचिठ्ठी देऊन माजी खासदार नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर भाजपमधील अनेक नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी स्वपक्षावर टीका केली असल्याचं पहावयास मिळालं आहे. अशातच बीडमध्ये भाजपचे नेते दादासाहेब मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान बीड येथील भाजप नेते दादासाहेब मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. पंकजा मुंडे यांना आपले स्वतः चे कार्यकर्ते तयार करायचे आहेत. मुंडे साहेबांच्या सोबत काम केलेले कार्यकर्ते ताईंना नको आहेत. त्यामुळे पक्षात त्या कार्यकर्त्यांची गळचेपी केली जात आहे.

भाजपमध्ये पंकजांचे कुणीही ऐकत नाही, अशातच त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना हाताशी धरायचे सोडून दिले आहे, नव्या कार्यकर्त्यांना महत्व देण्यास सुरुवात केली आहे. या स्तिथित आता भाजपमध्ये काम करणे अवघड झाल्याने काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुंडे यांनी म्हटले आहे.

 

COMMENTS