भाजपच्या नेत्याकडे सापडली कोट्यवधींची संपत्ती

भाजपच्या नेत्याकडे सापडली कोट्यवधींची संपत्ती

कल्याण – प्राप्तिकर विभागाने कल्याणचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बांधकाम व्यावसायिक मंगेश गायकर आणि त्यांचे भागीदार उमेश तन्ना यांच्या घरावर छापे घातले. 63 कोटी रुपयांच्या अघोषित संपत्तीबाबत पुरावे या छाप्यांमध्ये हाती लागले असल्याचे समजते. या कारवाईला प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

ही संपत्ती आपलीच असल्याचे गायकर आणि त्यांचे भागीदार तन्ना यांनी मान्य केले असून दंडासह करवसुली त्यांच्याकडून करण्यात येणार असल्याचे प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. एकाच वेळी 20 ठिकाणी केलेल्या या कारवाईत सुमारे 69 कोटी रुपयांचे जमिनीच्या टीडीआरसंदर्भातील रोख व्यवहार, तसेच फ्लॅटविक्रीसंदर्भातील रोख व्यवहारांचे पुरावे मिळाले आहेत. या संदर्भातील काही व्यवहारांच्या नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे.

 

COMMENTS