भाजप मंत्र्यानं केली उघड्यावर लघुशंका, फोटो व्हायरल !

भाजप मंत्र्यानं केली उघड्यावर लघुशंका, फोटो व्हायरल !

नवी दिल्ली – भाजपच्या मंत्र्यानंच पंतप्रधान मोदींच्या मोहीमेला हरताळ फासला असल्याचं समोर आलं आहे. राजस्थानमधील भाजपचे आरोग्यमंत्री कालिचरण सराफ हे उघड्यावर लघुशंका करत असल्याचा फोटो सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत कालिचरण सराफ हे रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे देशभराला स्वच्छतेचे धडे देणा-या पंतप्रधान मोदींच्या स्वच्छ भारत मोहीमेला त्यांच्याच मंत्र्यानं हरताळ फासला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान हा फोटो राजस्थानमधील जवाहर नगर येथील झालना बायपासवर काढण्यात आला असल्याची माहिती आहे. तसेच आरोग्यमंत्री कालिचरण सराफ ज्या ठिकाणी लघुशंका करत आहेत त्याच ठिकाणी त्यांची सरकारी गाडी आणि त्यांचा सुरक्षारक्षकही उभा असल्याचं दिसत आहे. भाजप मंत्र्यांच्या या कृत्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका केली जात असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.

COMMENTS