भाजप आमदार अडकले लग्नाच्या बेडीत

भाजप आमदार अडकले लग्नाच्या बेडीत

पुणे – माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते  विवाहबंधनात अडकले. पुण्यातील शुभारंभ लॉन्समध्ये अत्यंत थाटामाटात हा विवाहसोहळा पार पडला. त्यांना शुभार्शिवाद देण्यासाठी राज्यातील दिग्गज नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादीचे नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे, विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, गोपीचंद पडळकर, यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.यांनीही राम सातपुते यांच्या लग्नाही हजेरी लावली.

 

 

COMMENTS