ब्रेकिंग न्यूज – खासदार चिंतामण वनगा यांचे निधन !

ब्रेकिंग न्यूज – खासदार चिंतामण वनगा यांचे निधन !

दिल्ली – भाजपचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे निधन झाले आहे. आज सकाळी 10 वाजता त्यांना हार्ट अटकचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीतल्या राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. हॉस्पिटलमध्येच त्यांची प्राणज्योत मालवली. 2014 मध्ये वनगा हे पालघर या अनुसुचित जमातींसाठी राखीव असलेल्या पालघर मतदारसंघातून विजयी झाले होते.

यापूर्वीही ते भाजपचे खासदार राहिले आहेत. सुरूवातीपासून ते भाजपचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निधनाने भाजपचं मोठ नुकसान झालं आहे. आदिवासी समाजात वनगा हे मोठं प्रस्त म्हणून ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनाने पालघर परिसरावर आणि भाजप परिवारात शोककळा पसरली आहे.

COMMENTS