“…तर शेतकरी आत्महत्येसाठी मंत्रालयासमोर रांगा लावतील !”

“…तर शेतकरी आत्महत्येसाठी मंत्रालयासमोर रांगा लावतील !”

मुंबई – शेतकरी धर्मा पाटील यांची ही आत्महत्या नसून सरकारने केलेली हत्या आहे असा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केला आहे. धर्मा पाटील यांच्यावर ही वेळ आणणाऱ्या तत्कालीन पूनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी व या यंत्रणेतील इतर अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तसेच सरकार शेतकऱ्यांबाबत गंभीर नसेल तर आत्महत्या करण्यासाठी शेतकऱ्यांच्या मंत्रालयासमोर रांगा लागतील असा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

दरम्यान रविकांत तुपकर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून शेतक-यांच्या पाठींब्यांने भाजप सरकार सत्तेवर आले, मात्र आता शेतकऱ्यांना देशोधडीला लावल्या जात आहे. दरम्यान धर्मा पाटील यांच्या मृत्युला शासन जबाबदार असून ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खुन आहे. त्यांच्या मृत्युस जबाबदार असणाऱ्या सरकारातील मंत्री, अधिकारी व दलालांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर धर्मा पाटील यांचे बलीदान व्यर्थ जावू देणार नाही. या कुटूंबाला न्याय न मिळाल्यास व दोषींवर खुनाचे गुन्हे दाखल न झाल्यास राज्यभर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

COMMENTS