भाजपच्या “या” दोन नेत्यांमध्ये दिवाळीत मैत्रीचे सुर !

भाजपच्या “या” दोन नेत्यांमध्ये दिवाळीत मैत्रीचे सुर !

पुणे –  भाजपात महापालिका निवडणुकीपासून जोरदार गटबाजी सुरु आहे. त्यात पालकमंत्री गिरीश बापट आणि खासदार संजय काकडे यांचे दोन प्रमुख गट आहेत. या दोघात अनेकदा जाहीर कलगीतुरा देखील रंगला. माध्यमांमधून देखील या देघांनी एकमेकांना लक्ष केलं.

दिवाळीच्या सणाने मात्र या दोघांना एकत्र आणलं आहे. भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांना आज सकाळी त्यांच्या घरी जाऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी न सोडणा-या या दोघात आज दिवाळी फराळ आणि गप्पा रंगल्या. दिवाळीच्या निमीत्ताने या दोघात निर्माण झालेला हा गोडवा कीती दिवस टिकणार याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु झाली आहे.

 

COMMENTS