‘लक्ष्मी’ मागतीये मोदी-शहांकडे देश चालवायला पैसे; राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून मोदी,शाहांवर निशाणा

‘लक्ष्मी’ मागतीये मोदी-शहांकडे देश चालवायला पैसे; राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून मोदी,शाहांवर निशाणा

मुंबई – दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र रेखाटले आहे  लक्ष्मीपूजनाचे औचित्य साधून राज यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  भाजप अध्यक्ष अमित शाह जोरदार निशाणा साधला आहे. राज यांनी व्यंगचित्र आपल्या फेसबुक पेजवर शेअर केल्यानंतर तासाभराच्या आत 9 हजार लाईक्सचा टप्पा पार केला आहे.

दीपावलीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं राज ठाकरे यांनी मोदी-शाह जोडीवर आपल्या व्यंग्यचित्राच्या माध्यमातून निशाणा साधलाय. यात लक्ष्मी पैशांकरता पंतप्रधान मोदी यांच्याकडे अश्रू ढाळत असल्याचे दाखविले आहे. ‘देश चालवयला मला पैसे देता का?’ अशी विचारणा लक्ष्मी मोदी-शाह यांना करीत आहे. असे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून यापूर्वीही मोदींवर निशाणा साधला आहे. या आधी त्यांनी दाऊदला फरफटत आणणार अशा आशयाचे काढलेले मोदींचे व्यंगचित्र चर्चेचा विषय ठरले होते.
 

COMMENTS