बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, ‘त्या’ कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

बुलडाण्यात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, ‘त्या’ कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

बुलडाणा – जिल्ह्यातील नांदुरा याठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेदरम्यान काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ केल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री भाषणासाठी उभे राहिले असता त्यांना या कार्यकर्त्यांनी काळे झेंड दाखवत गोंधळ घातला. शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या मागणीसह, जिगाव प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला देण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. या गोंधळानंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री नांदु-यात गेले होते. या कार्यक्रमादरम्यानच काँग्रेस आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या सभेआधीच दोन गटांमध्ये अचानक वाद झाला. या वादात लोकांनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने हा वाद शमला.

COMMENTS