राहुल गांधींकडून आज संध्याकाळी पार्टी, ‘या’ नेत्यांना खास निमंत्रण !

राहुल गांधींकडून आज संध्याकाळी पार्टी, ‘या’ नेत्यांना खास निमंत्रण !

दिल्ली – काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. त्यानंतर राहुल गांधी यांनी आज खास पार्टीचं आयोजन केलं आहे. आज सध्याकाळी ही पार्टी होणार आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सन्मानार्थ ही पार्टी दिली जाणार असल्याचं बोललं जात असलं तरी राहुल गांधी यांनी मात्र स्वतःची टीम तयार करण्यासाठी ही पार्टी दिली जात असल्याचं बोललं जात आहे. या पार्टीसाठी राहुल गांधी यांनी अनेकांना निमंत्रण दिलं आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसचे सर्व खासदार, काँग्रेसचे पदाधिकारी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे नेते आणि विधायक दलाच्या नेत्यांना या पार्टीसाठी खास निमंत्रित केलं आहे. या मेजवानीमध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच राहुल गांधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरुन राहुल गांधींनी अध्यक्ष म्हणून पक्षाच्या बांधणीसाठी सुरुवात केल्याचं दिसत आहे.

COMMENTS