“भाजप नेते येदियुरप्पा यांनी 1800 कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला वाटले !”

“भाजप नेते येदियुरप्पा यांनी 1800 कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला वाटले !”

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी 1800 कोटी रुपये भाजपच्या केंद्रीय समितीला वाटले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. द कॅरावानने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या आधारे काँग्रेसने हे आरोप केले आहेत.कॅरावानने आपल्याकडे एक डायरी असल्याचा दावा केला आहे. या डायरीत येदियुरप्पा यांनी काही नोंदी केल्या असून भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना जवळपास 1800 कोटी रुपये वाटल्याचा दावा केला आहे. अरुण जेटली, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यांचं नाव असून काही न्यायाधीश आणि वकिलांचीही नावे आहेत.

दरम्यान अरुण जेटली आणि नितीन गडकरी यांना प्रत्येकी 150 करोड तर राजनाथ सिंह यांना 100 करोड तर आडवणी आणि मुरली मनोहर जोशी 100 करोड दिले असल्याची माहिती यामध्ये आहे. तसेच या रिपोर्टवरुन काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून येदियुरप्पा यांनी यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी न्यूज रिपोर्ट सादर करत भाजपाने हे आरोप खरे आहेत की खोटे यासंबंधी स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

येदियुरप्पा यांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले आहेत.आगामी लोकसभा निवडणुकीत फायदा मिळावा यासाठी काँग्रेसने हा रिपोर्ट पेरला आहे. काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आलेले मुद्दे खोटे आणि संदर्भ नसलेले आहेत. आयकर विभागाने आधीच सर्व कागदपत्रं खोटी असल्याचं सांगितलं आहे’, अशी माहिती येदियुरप्पा यांनी दिली आहे.

COMMENTS